सिआरझेड कायदा मुंबईत शिथिल होणार !

January 7, 2011 4:43 PM0 commentsViews: 5

07 जानेवारी

कोस्टल रेग्युलेशन झोन अर्थात सिआरझेडच्या नियमावलीत मुंबई शहराला विशेष दर्जा देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहरासाठी हा कायदा मोठ्या प्रमाणात शिथिल केला जाणार आहे. मुंबईतल्या सिआरझेड परिसरातील 16 हजार मोडकळीस आलेल्या इमारती, 137 गावठाणं, 32 कोळीवाडे आणि 136 असआरऐ प्रकल्पांचा आता पुनर्विकास करता येणार आहे. यासंबंधीची घोषणा शनिवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश मुंबईत करणार आहेत. पण सिआरझेडमधील शिथिलतेमुळं मुंबईत बिल्डरांना काँक्रिटचं जाळं पसरवायाला मोकळं रान मिळेल अशी टीका तज्ज्ञांकडून होत आहे.

close