कसाबचा शिक्षेसंदर्भात सोमवारी सुनावणी

January 7, 2011 4:49 PM0 commentsViews: 5

07 जानेवारी

मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याची शिक्षा कायम व्हावी याबाबत मुंबई हायकोर्टात सध्या सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सोमवारी संपणार आहे. तसेच या प्रकरणातील एक आरोपी सबाउद्दीन शेख याच्या वकिलांनी काही मुद्दे कोर्टासमोरं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार सबाउद्दीन याच्या विरोधात दाखल करण्यात आलेलं अपील हे बेकायदेशीर आहे. पण कोर्टानं त्यांचा हा दावा फेटाळून लावला. या प्रकरणात सबाउद्दीन याच्या हल्यातील सहभागाबाबत सोमवारी विशेष सरकारी वकिल युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतरच हा संपूर्ण युक्तीवाद संपणार आहे.

close