गृहमत्र्यांना अहवाल सादर करण्यासाठी शनिवारपर्यंत मुदत

January 7, 2011 5:28 PM0 commentsViews: 7

07 जानेवारी

औरंगाबादमधले कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटत आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांना अहवाल सादर करण्यासाठी आयजींनी उद्या संध्याकाळपर्यंत वेळ मागून घेतली आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांना 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कोठडीत असताना उपचार घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली. औरंगाबाद विभागाचे आय.जी. प्रभात रंजन यांना हे आदेश देण्यात आले. तसेच पोलिस महासंचालक शिवानंदन यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. त्यांना ही शिक्षा मिळाली ती मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसल्याबद्दल. बुधवारी मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये आले असतांना हर्षवर्धन जाधव त्यांच्या ताफ्यात घुसले.आणि शिक्षा म्हणून पोलिसांनी जाधव यांचे असे हाल केले. या जबर मारहाणीनंतर जाधव यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तर हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांनाचं मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी केला. तर झाल्या प्रकाराचा मनसेनं निषेध केला.अशी अमानुष मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला असा सवाल मनसे नेते विचारत आहे. या प्रकरणाविरोधात वातावरण तापायला लागलं. आणि गृहमंत्र्यांनी प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या मारहाणीवर आता तीव्र पडसाद उमटत आहे.

आरोपीला एवढ्या अमानुषपणे मारण्याचा अधिकार पोलिसांना आहे का असा सवाल आता केला जात आहे. त्यामुळं एका आमदाराला पोलिस अशी मारहाण करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय व्यथा असा प्रश्न आता विचारला जातो. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी ज्या पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप होतो त्यांना रूग्णालयात नेल्यानंतर दाखल करण्यात आलं नसताना तसा खोटं रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं पोलिसांच्या या एकूणच गोलमाल प्रकारावर मनसेच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

close