2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचे कॅगचे आकडे चुकीचे !

January 7, 2011 5:33 PM0 commentsViews: 5

o7 जानेवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी कॅगवरच हल्लाबोल केला. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबतच्या कॅगच्या रिपोर्टवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा घोटाळा 1 लाख 76 हजार कोटींचा आहे कॅगचा दावा चुकीचा आहे. 2 जी स्पेक्ट्रम वाटपामुळे सरकारचा महसूल अजिबात बुडालेला नाही असा दावा सिब्बल यांनी केलाय. कॅगबद्दल आपल्याला आदर आहे. पण त्यांच्या अहवालात त्रुटी असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं. सिब्बल यांनी एनडीएलाही फटकारलं. एनडीए सरकारनंच स्पेक्ट्रम वाटपात 'पहिल्यांदा येणार्‍याला प्राधान्य' असं चुकीचं धोरण राबवलं असं ते म्हणाले. आता या मुद्द्यावर विरोधक जे करत आहेत ते घटनाबाह्य असल्याचंही सिब्बल यांनी म्हटलं.

close