गंभीर ठरला महाग खेळाडू ; गांगुलीला ‘दाद’ नाही

January 8, 2011 8:20 AM0 commentsViews: 4

08 जानेवारी

आयपीएलच्या चौथ्या हंगामासाठी बंगलोरमध्ये आजपासून खेळाडूंचा लिलाव सुरु झाला. यावेळी लिलावासाठी तब्बल साडे तीनशे खेळाडू उपलब्ध होते. यापैकी पहिल्या दिवशी 72 खेळाडूंवर बोली लागली. सकाळी 11 वाजता लिलावाची प्रक्रिया सुरु झाली आणि यासाठी बंगलोरच्या हयात रिझेंन्सीमध्ये दहाही टीमचे प्रतिनिधी हजर होते. यात निता अंबानी, प्रिती झिंटा, विजय मल्ल्या हे टीम मालकही उपस्थित होते. आठ टीमबरोबरच आयपीएलमध्ये नव्यानं समावेश झालेल्या सहारा पुणे वॉरियर्स आणि कोची टीमबद्दल प्रचंड उत्सुकता होती. पण टीमची पहिली पसंती भारतीय खेळाडूंनाच मिळाली. बोलीला सुरुवात झाली ती भारतीय टीमचा भरोवशाचा ओपनर गौतम गंभीरनं. गंभीरला टीममध्ये घेण्यासाठी सर्वच टीममध्ये चढाओढ रंगली. पण शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं गंभीरसाठी तब्बल 11 कोटी 4 लाखांची बोली लावत आपल्या टीममध्ये घेतलं. संपूर्ण आयपीएल मधला गंभीर सर्वात महागडा खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये स्फोटक बॅटिंगसाठी प्रसिध्द असलेल्या युसूफ पठाणलाही नाईट रायडर्सनं आपल्याकडे खेचून घेतलं. यासाठी त्यांनी तब्बल 9 कोटी 66 लाख रुपये मोजले. गंभीरनंतर सर्वाधिक रक्कम मिळवणारा तो दुसरा़ खेळाडू ठरला. याशिवाय युवराज सिंग, इरफान पठाण, प्रविण कुमार, अभिषेक नायर यांनाही या लिलावात लॉटरी लागली. पण त्याचबरोबर काही सिनिअर खेळाडूंकडे मात्र टीम मालकांनी दुर्लक्ष केलं. गांगुली, लारा, ख्रिस गेल अशा दिग्गज खेळाडूंना धक्का बसला. एकुणच लिलावाचा पहिला दिवस सर्वच टीमसाठी महत्वाचा ठरला.

सौरव दादाला 'दाद' नाही तर लाराला टाटा

आयपीएलच्या चौथ्या हंगामात काही खेळाडूंवर जबरदस्त बोली लागली, तर काही खेळाडूंवर कमी बोली लागली. पण काही खेळाडूंवर तर बोलीच लागली नाही. यातला पहिला खेळाडू भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली. बोलीसाठी सौरव गांगुलीचं नावं पुकारण्यात आलं. पण एकाही टीमच्या प्रतिनिधीचा हात बोलीसाठी वरती आला नाही. सर्वच दहा टीमनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सौरव गांगुली याआधी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. आणि टीमचं कॅप्टनपदही त्यानं भुषवलं होतं. पण यंदा नाईट रायडर्सनंही गांगुलीला हात दिला नाही. भारताच्या सौरव गांगुलीबरोबरच वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेलवरही बोली लागली नाही. आयपीएलच्या पहिल्या तीन हंगामात गेलही कोलकाता नाईट रायडर्सतर्फे खेळला होता. आणि टीमसाठी त्यानं चांगली कामगिरीही केली होती. पण यावेळ नाईट रायडर्सनंही त्याला पसंती दिली नाही. गेलबरोबरच वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन आणि दिग्गज प्लेअर ब्रायन लारालाही धक्का बसला. आयपीएलच्या चौथ्या हंगामात खेळण्यासाठी लारा उत्सुक होता.पण त्याच्याही हाती निराशा आली. आयपीएलमध्ये एकाही टीमनं लारावर बोली लावली नाही.

भज्जी आणि सायमंड एकत्र खेळणार !

आयपीएलच्या चौथ्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सनं सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, लसिथ मलिंगा आणि कायरन पोलार्ड यांना कायम ठेवलं. पण प्रमुख बॉलर झहीर खान मात्र यावेळी मुंबई टीममध्ये दिसणार नाही. त्याऐवजी रोहित शर्मा, ऑलराऊंडर ऍण्ड्र्यु सायमंड मुंबईसाठी खेळतील.

खेळाडूंची खरेदी

गौतम गंभीर, कोलकाता नाईट रायडर्स- 11 कोटी 4 लाख

टि दिलशान, बंगलोर रॉयल्स – 2 कोटी 99 लाखझहीर खान, बंगलोर रॉयल्स -4 कोटी 14 लाखरॉस टेलर, राजस्थान रॉयल्स -46 लाखयुसुफ पठाण, नाईट रायडर्स -9 कोटी 66 लाखकेविन पीटरसन, डेक्कन चार्जर्स -2 कोटी 99 लाखमहेला जयवर्धने, कोची टीम – 6 कोटी 90 लाखयुवराज सिंग, पुणे सहारा- 8कोटी 28 लाखएबी डिव्हिलिअर्स – 5 कोटी 60 लाख रॉबिन उथप्पा पुणे सहारा – 9 कोटी 66 लाख व्ही व्ही एस लक्ष्मण- कोची टीम 1 कोटी 84 लाख इरफान पठाण – दिल्ली डेरडेविल्स – 8 कोटी 74 लाख आर पी सिंग – कोची टीम 2 कोटी 30 लाख एस श्रीसंत- कोची टीम 4 कोटी 14 लाख व्ही व्ही लक्ष्मण – कोची टीम 1 कोटी 84 लाख डॅनिअल व्हिटोरी – रॉयल चैंलेंजर्स 2 कोटी 53 लाख ब्रँडन मॅक्युलम – कोची टीम 2 कोटी 18 लाख रोहित शर्मा – मुंबई इंडियनस् 9 कोटी 20 लाख ऍण्ड्रयू सायमंड – मुंबई इंडियनस् 3 कोटी 91 लाख कुमार संगकारा – डेक्कन चार्जर्स 3 कोटी 22 लाखग्रीम स्मीथ – पुणे सहारा 2 कोटी 30 लाख ऍडम गिलख्रिस्ट – किंग्स इलेवन 4 कोटी 14 लाख

close