आमदार जाधव यांना मारहाणीची गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

January 8, 2011 9:15 AM0 commentsViews: 1

08 जानेवारी

कन्नडचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाणीची गंभीर दखल घेतली असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलं. आमदार जाधव यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणाचा अहवाल आज सादर करण्यात येणार आहे. अहवाल मिळाल्यानंतरच चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. आर. आर. पाटील आज औरंगाबाद दौर्‍यावर आहेत.

close