आमदार जाधव याना मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा – उध्दव ठाकरे

January 8, 2011 10:28 AM0 commentsViews: 2

08 जानेवारी

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मारहाणीचं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निषेध केला. कन्नडचे आमदार जाधव बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जबर मारहाण केली होती. सर्व स्तरातून त्याचे तीव्र पडसाद उमटतायत. आज उद्धव ठाकरेंनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच आमदाराला अमानुषपणे मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली.

close