पंढरपुरात घोडेबाजार तेजीत

November 2, 2008 3:15 PM0 commentsViews: 5

2 नोव्हेंबर, पंढरपूरसुनील उंबरेपंढरीची कार्तिकी वारी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या वारीचं मुख्य आकर्षण असलेला घोडेबाजार देशभरातल्या घोड्यांच्या हजेरीनं गजबजून गेला आहे. या बाजारात महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान यासारख्या राज्यातून घोडे विक्रीसाठी येतात. पंढरपुरात भरणार्‍या वर्षातल्या चार वार्‍यांमध्ये आषाढीवारी ही दिंड्या-पालख्यांची तर कार्तिकीवारी ही गाई-म्हशी आणि घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. अगदी पाच हजारांपासून ते पाच लाखापर्यंतची वेगवेगळ्या जातीची जनावरं या बाजारात पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी काश्मीरपर्यंतचे लोक याला हजेरी लावतात. पंधरा दिवस चालणारा हा राज्यातला एकमेव बाजार आहे. शेकडो घोड्यांमधून घोड्यांच्या 72 खोड्या जाणून खरेदी केली जाते. त्यासाठीची तज्ज्ञ मंडळी बाजारात ठाण मांडून असतात. अगदी काश्मीरच्या खोर्‍यात लागणार्‍या दोन-अडीच फुटांच्या तट्टूपासून ते सहा फुटांपर्यंतच्या देखण्या घोड्यांची इथे रेलचेल असते. घोडेबाजार म्हटलं की, आपल्या आठवतो, राजकारण, बेरकी राजकारणी मंडळी आणि त्यांच्या खोड्या. पण पंढरपूरच्या या घोडेबाजारात जास्त खोड्या असणार्‍या घोड्यांना कमी मागणी असते. मात्र राजकारणात उलटं चित्र आहे.

close