प्रेत उकरुन पैशाचा पाऊस पाडणार्‍या भोंदू तांत्रिकांना अटक

January 8, 2011 8:28 AM0 commentsViews: 46

08 जानेवारी

पैशाचा पाऊस पाडण्याची सिध्दी मिळवण्यासाठी महिन्याभरापूर्वी दफ़न करण्यात आलेल्या मृतदेहाला उकरण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन भोंदू तांत्रिकांना चिपळूण पोलिसांनी अटक केली. या आरोपींना चिपळूण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चिपळूणच्या कोंडयेगावातल्या स्मशानभूमीत हा प्रकार करणार्‍या तांत्रिकांना पळून जात असताना स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र यामध्ये सूत्रधार असणारा याच गावातला स्थानिक भोंदू रमेश गुरव हा अद्यापही फ़रार आहे. तर पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये एकजण चिपळूण मधल्या कोळकेवाडीचा तर दुसरा भिवंडीचा भोंदू तांत्रिक आहे.

close