आमदार मारहाण प्रकरणी 12 जानेवारीला राज ठाकरेंची निषेध सभा

January 8, 2011 12:45 PM0 commentsViews: 6

08 जानेवारी

कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी अखेर राज ठाकरे यांनी मौन सोडलं. आमदार हर्षवर्धन जाधव हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना आता भेटण्याची परवानगी न्यायालयानं दिली नाही. येत्या 12 जानेवारीला न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर जाधव यांना भेटून संध्याकाऴी औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर जाहीर निषेध सभा घेणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच त्याच वेळेला माझी भूमिका स्पष्ट करेन असंही ते म्हणाले. शिवाय हा मारहाणीचा प्रकार दिसतो तितका साधा नाही. त्याही पेक्षा अनेक गोष्टी त्यात आहेत. या सगळ्यांचा उलगडा मी 12 तारखेच्या जाहीर सभेत करेन असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

close