पुण्यात सैनिकांच्या गृहनिर्माण संस्थेत अधिकार्‍यांची घुसखोरी

January 8, 2011 12:48 PM0 commentsViews: 3

08 जानेवारी

मुंबईनंतर आता पुण्यातही 'आदर्श' घोटाळा उघडकीस आला. कारगील युध्दातील सैनिकांसाठी निर्माण केलेल्या गृहनिर्माण संस्थेत सनदी अधिकार्‍यांनी घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पीएंसह अनेक सरकारी कर्मचार्‍यांचा त्यात समावेश आहे. लोहगावमध्ये पाच एकर जमिन आहे. त्यात कारगील युध्दात योगदान देणार्‍या 148 आजी-माजी सैनिक आणि केन्द्रीय सुरक्षा कर्मचार्‍यांच्या डिफेन्स पर्सनल हाऊसिंग सोसायटीसाठी 2005 मध्ये सरकारनं जागा हस्तातंरीत केली होती. पण आता या गृहनिर्माण संस्थेत सनदी अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी घुसखोरी केली.

close