चंद्रपूरमध्ये वाघाची कातडी तस्कराना रंगेहाथ पकडले

January 8, 2011 8:13 AM0 commentsViews: 2

08 जानेवारी

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर जवळील गोपालपूर फाट्याजवळ वाघाच्या कातडीची तस्करी करताना सहाजणांना पडकलं. या वाघाच्या कातडीची किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी भिमराव सिजम, लख्खू मेश्राम, मोराती सुरपाम, राजेश तोडासे, विठ्ठल नंदीवार आणि धर्मा कमरे यांना पकडण्यात आलं आहे. हे सहाजण गडचांदूर येथील गोपालपूर फाट्याजवळ या वाघाची कातडीची सौदा करण्यासाठी आले होते. या आरोपींवर गुन्हे वन्य प्राणी संरक्षण कायदा 1972 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वाघाच्या कातडीची लांबी 10.2 फूट आहे.

close