मनसेच्या कार्यकर्त्यांचं ‘थोबाडीत मारो’ आंदोलन

January 8, 2011 4:28 PM0 commentsViews: 7

08 जानेवारी

कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारो आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वत:च्या थोबाडीत मारत टी पॉईंट्स ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. दोषी पोलीस अधिकार्‍यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी तहसिलदारांना केली.

close