कॅगबद्दल सिब्बल यांच्या वक्तव्यापासून काँग्रेसनं हात झटकले

January 8, 2011 4:42 PM0 commentsViews:

08 जानेवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी कॅगच्या अहवालावर दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यापासून काँग्रेसनं दूर राहणं पसंत केलं. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा 1 लाख 76 हजार कोटींचा आहे कॅगचा दावा चुकीचा आहे. 2 जी स्पेक्ट्रम वाटपामुळे सरकारचा महसूल अजिबात बुडालेला नाही असा दावा सिब्बल यांनी शुक्रवारी केला होता. पण हा मुद्दा सिब्बल आणि कॅग-दरम्यानचा आहे. पक्षाचा त्याच्याशी काहीच संबंध नाही असं काँग्रेसनं म्हटलं. दरम्यान, भाजपनं मात्र सिब्बल यांना फटकारलंय. सिब्बल यांचं विधान अयोग्य असल्याचं भाजपचे नेते आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.

close