ठाकरेंवर लालुंचा हल्लाबोल

November 2, 2008 3:22 PM0 commentsViews: 2

2 नोव्हेंबर, दिल्लीउत्तर भारतीयांवरील वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात बिहारमधील सर्व आमदार – खासदारांनी राजीनामे द्यावेत, असं आव्हान केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे. याशिवाय पत्रकार परिषदेत लालूप्रसाद यादव यांनी ठाकरे कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवला.' बिहारच्या लोकांची प्रतारणा करणार्‍या दोषींवर कारवाई करण्यासाठी आणि बिहारच्या हितासाठी रराज्यातील सर्वंच पक्षाच्या आमदार,खासदारांनी राजीनामे द्यावेत ', असं लालूप्रसाद यादव पत्रकार परिषदेत म्हणाले. पुढे ते म्हणाले, ' कोणताही पक्ष ठाकरे घराण्यातील कुठल्याही पक्षाशी युती करेल, त्यांना देशद्रोही मानलं जाईल '. हे स्पष्ट करताना लालुजींनी मराठी जनतेशी कोणतंही भांडण नसल्याचं सांगितलं.

close