इंद्रेशकुमार यांची सीबीआयविरुद्ध अवमानाची याचिका

January 8, 2011 4:47 PM0 commentsViews:

08 जानेवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी सीबीआयविरोधात कोर्टात अवमानाची याचिका दाखल केली. समझौता बॉम्बस्फोट प्रकरणात हात असल्याचं संघाचा नेता स्वामी असिमानंद यानी सीबीआयसमोर कबूल केलं होतं. तसेच मक्का मस्जीद आणि अजमेर बॉम्बस्फोटाशी संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचा संबंध असल्याचा त्यानं केला होता. आयबीएन-नेटवर्क आणि तहलकाला त्याचा हा कबुलीजबाब मिळाला. असिमानंदचा हा कबुलीजबाब सीबीआयनं जाणूबुजून फोडल्याचा आरोप इंद्रेशकुमार यांनी केला. याप्रकरणी सीबीआय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

close