मुंबई विकायला काढली -मुख्यमंत्री

January 10, 2011 9:10 AM0 commentsViews: 1

10 जानेवारी

राजकारणी, नोकरशहा आणि बिल्डर्स यांनी मुंबई विकायला काढलीय असं वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरगावमध्ये केलं होतं. या सगळ्यांची राज्यात अभद्र युतीच झाली असा गंभीर आरोपही त्यांनी केला. बिट्स ग्लोबल मिट या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. राज्यात गेल्या दोन ते तीन महिन्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतोय आणि या भ्रष्टाचारावर उपाययोजना करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

दरम्यान मुख्यमंत्री पृृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. पण या भ्रष्ट युतीसंदर्भात केवळ खंत करुन चालणार नाही तर ठोस कारवाई करण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावं अशी मागणी वजा आवाहन भाजपच्या नेत्यांनी केले.

close