नागपुरात धडकला बैलबंडी मोर्चा

January 10, 2011 9:55 AM0 commentsViews: 63

10 जानेवारी

केंद्र सरकारनं कापुस धान आणि कांदा यावर केलेल्या निर्यात बंदीच्या विरोधात अपक्ष आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील बेलोरापासून काढण्यात आलेला बैलबंडी मोर्चा आज नागपूरमध्ये धडकला आहे. 150 बैलबंड्या आणि 2 हजार शेतकरी यात सहभागी झाले होते. आंदोलनकरत्यांनी धान, कांदा आणि कापसच्या तीन बैलबंडी पेटवून दिल्या आणि त्याचा निषेध केला. मोठ्या संख्येनं शेतकरी बैलगाडी घेऊन गेल्या काही दिवसापासून हा प्रवास करून नागपूरला आले होते. नागपूर विनातळाहून शेतमाल दुबईला पाठवावा यासाठी अशा प्रकारचे अनोख आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात शेतकरी नेते विजय जावंधिया, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडेही सहभागी झाले आहेत.

close