मुंबईत काही भागात तीन दिवस पाणीपुरवठा बंद

January 10, 2011 10:11 AM0 commentsViews: 6

10 जानेवारी

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्यानं मुंबईत आजपासून तीन दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी होणार आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद असणार

10 जानेवारी- कफ परेड, कुलाबा, नेव्ही नगर, नरिमन पॉईन्ट, बॅकबे रेक्लीमेशन, फोर्ट, चर्चगेट, साबुसिद्दीकी मार्ग, अंधेरी ,जोगेश्वरी पुर्व, गोरेगाव

11 जानेवारी- काळबादेवी, सीपी टॅॅक, गिरगाव, ठाकुरद्वार, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, वांद्रे, सांताक्रुझ पुर्व

12 जानेवारी – कफ परेड, कुलाबा, नेव्हीनगर, नरिमन पॉईन्ट, बॅकबे रेक्लीमेशन, फोर्ट, चर्चगेट, साबुसिद्दीकी मार्ग,अंधेरी पश्चिम,पुनमनगर,विलेपार्ले पुर्व या भागात पाणीपुरवठा बंद असणार आहेत.

तर दादार,परेल,माटुंगा, घाटकोपर भागात पन्नास टक्के आणि मालाड, कांदिवली भागात 10 टक्केपाणीकपात तीन दिवस असेल. त्यामुळे पाणी जपुन वापरण्याच्या सुचना महापालिकेनं दिल्या आहेत.

close