घरच्यांकडून उशीरा सत्कार ; कविताची खंत

January 10, 2011 10:20 AM0 commentsViews: 2

10 जानेवारी

जगानं सत्कार केला तरी घरच्यांचा सत्कार आधी व्हायला हवा होता अशी खंत ऍथलीट कविता राऊतनं व्यक्त केली. कॉमनवेल्थ ब्राँझ आणि एशियन गेम्समध्ये सिल्व्हर मेडल मिळवल्यावर आदिवासी विकास खात्यातर्फे तिचा सत्कार आज आयोजित करण्यात आला होता.पण आदिवासी विकास खात्याने हे कौतुक करायला उशीर केला अशी खंत कवितानं व्यक्त केली. आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते तिचा सत्कारही करण्यात आला. गेला महिनाभर राज्यात आणि देशात आपले अनेक सत्कार झाले. पण आदिवासी भागातली असताना या विभागानेच सगळ्यात शेवटी दखल घेतली याचं वाईट वाटतं असं कविता म्हणाली. हे सांगताला स्टेजवरच तिला अश्रू आवरले नाहीत. बबनराव पाचपुतेंनी मग तिची समजूत काढली. आदर्श घोटाळा आणि इतर व्यस्त कार्यक्रमांमुळे सत्काराला थोडा उशीर झाला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

close