मालेगाव बॉम्बस्फोटाची नव्यानं चौकशी करावी -गृहमंत्री

January 10, 2011 10:50 AM0 commentsViews: 3

10 जानेवारी

मालेगाव बॉम्बस्फोटाची नव्यानं चौकशी करण्याची विनंती राज्य सरकारनं सीबीआयला करणार आहे. असिमानंद यांच्या कबुलीनंतर जी नविन माहिती समोर आलीय ती माहिती तपासून मालेगाव बाँबस्फोटाची नव्यानं चौकशी करावी करावी अशी विनंती केल्याची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आज दिली. सर्व अतिरेकी कारवायांची चौकशी एनआयएनं करायला राज्य सरकारची हरकत नाही केंद्रानं हा निर्णय घ्यायचा आहे.असंही ते म्हणाले. असिमानंद यांच्या कबुलीनंतर आरएसएस, अभिनव भारत, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था अनेक अनेक संघटनांवर बंदी घालण्याची मागणी होतेय. त्यामुळे अशा सघटनांच्या कार्यप्रणालीची माहिती एटीएसला सरकारकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संघटनांमधील काही व्यक्तींची भूमिका आहे की संघटनांची धोरण कशी आहेत याची माहिती एटीएस गोळा करतंय असंही आर.आर.पाटील यांनी सांगितलंय.

close