जळगावातील ऐतिहासिक वहनोत्सवाला सुरुवात

November 2, 2008 3:35 PM0 commentsViews: 5

2 नोव्हेंबर, जळगावप्रशांत बाग135 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या वहनोत्सवास जळगावांत सुरुवात झाली आहे. जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर देवस्थानचा हा उत्सव. दरवर्षी कार्तिकी एकादशीला या वहनोत्सवाची सुरुवात होते.भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात हत्तीचं वहन शहरांतून निघतं. सदगुरू अप्पा महाराजांचे वंशज विद्यमान गादिपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते या वहनोत्सवाची सुरुवात होते.भारुड या लोककलेनं बोलीभाषेत कथा सांगणार्‍या कलाकारांसाठी वहनोत्सव एक पर्वणी असते.शहराच्या विविध भागात या वहनानं पहाटेपर्यंत मार्गक्रमण केलं. रामपेठ भागातील श्रीराम मंदिरात या प्रत्येक वहनाची सांगता झाली.

close