‘लोहरी दी रात’ मुंबईत साजरी

January 10, 2011 11:10 AM0 commentsViews: 2

10 जानेवारी

पंजाबी आणि शीख बांधवांची 'लोहरी दी रात' मुंबईत साजरी करण्यात आली. लोहरीपासुन पंजाबी सण आणि उत्सवांना सुरुवात होते. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. मुंबईतही या निमित्तानं पंजाबी बांधवांना एकत्र जमता यावं यासाठी मुंबईतही गेली दोन वर्ष हा सण साजरा केला जातो. हिंदुंच्या होळी सणाप्रमाणेच लोहरी पेटवुन हा सण साजरा केला जातो. या वर्षी प्रसिध्द सुफी गायक हंसराज हंस यांची संगीत मैफल या कार्यक्रमासाठी आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील शीख बांधव या निमित्तानं एकत्र आली होती. अनेक सेलिब्रेटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

close