पावसकर समर्थक आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

January 10, 2011 9:05 AM0 commentsViews: 2

10 जानेवारी

नुकताच शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले शिवसेनेचे बंडखोर किरण पावसकर यांचे समर्थक आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पावसकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सहार विमानतळाजवळ एव्हीएशनचं ऑफिस आहे. हे ऑफिस ताब्यात घेण्यावरून पावसकर यांचे समर्थक आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये काही गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. दोन्हीकडच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन केलं.

close