शिवसेनेनं आपल्या नेत्यांना आवरावं – मुनगंटीवार

January 10, 2011 11:46 AM0 commentsViews: 3

10 जानेवारी

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे या दोन नेत्यांच्या वादानं आता गंभीर वळण घेतलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी थेट शिवसेनेलाच इशारा दिला. शिवसेनेनं आपल्या नेत्यांना वेळीच आवरावं. अन्यथा याचा परिणाम 2014 च्या निवडणुकीवर होईल असा इशारा मुनगंटीवारांनी दिला. ते रत्नागिरीत बोलत होते. शिवसेनेच्या नेत्यांना वेळीच आवर घातला नाही तर त्याचे परिणाम पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर निवडणुकीत दिसतील असंही त्यांनी म्हटलं. तसेच राज्यातलं सत्तासमीकरणही बदलू शकतील असा इशाराही मुनगंटीवारांनी दिला.

close