पाणी उकळून प्या -महापौर

January 10, 2011 2:38 PM0 commentsViews: 4

10 जानेवारी

मुंबईत पुरवठा होत असलेलं पाणी पिवळ असलं तरीही ते अशुध्द नाही आणि पिण्यायोग्य असल्याचा दावा महापौरांनी केला. पण तरीही लोकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून पाणी उकळून प्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. थंडीचं प्रमाण वाढल्यानं कमी तापमानावर ऑक्सीडेशन होऊन पाणि पिवळ येत असल्याचा प्राथमिक अंदाज डेप्युटी हायड्रोलिक इंजीनियरनं व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी हायड्रोलिक इंजिनियर आणि महापौरांनी मुंबईत होत असलेल्या पिवळ्या पाण्याची पाहणी करण्यासाठी भांडुपच्या पाणी शुध्दीकरण प्रकल्पाला भेट दिली.

close