पुण्यातील ‘आदर्श’ घोटाळ्याची सखोल चौकशी करणार – दिलीप बंड

January 10, 2011 2:45 PM0 commentsViews: 1

10 जानेवारी

मुंबई पाठोपाठ पुण्यातही आदर्शच्या धरतीवर जो घोटाळा उघडकीस आला त्यातील शंभर सरकारी बाबूंचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी जाहीर केला. पुण्यातील लोहगाव इथं कारगिल सैनिकांच्या नावानं जमीन घेऊन जी सोसायटी होणार होती त्यात 100 शंभर सरकारी अधिकार्‍यांची नावं घुसवण्यात आली. पुण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आधी या प्रस्तावाला मंजुरी दिली. पण आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण वाढू शकतं हे लक्षात घेऊन हे सरकारी बाबुंचं सदस्यत्व करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. दिलीप बंड यांनी त्याला मंजुरी दिली. तसेच या प्रकरणात काही गैर झालंय का, याची देखील सखोल चौकशी करणार असल्याचं सांगितलं.

close