त्या आल्या..त्यांनी पाहिले आणि चोरी झाली !

January 10, 2011 3:04 PM0 commentsViews: 3

10 जानेवारी

नागपूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकांनात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतचं आहेत. शनिवारी शहरातल्या गजबजलेल्या महाल भागातल्या रोकडे ज्वेलर्समध्ये चोरी झाली. ही चोरी सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली. यामध्ये एक मुलगी दागिने चोरत असताना स्पष्ट दिसत आहे. या मुली दुकानात शिरल्या आणि दागिने पाहण्याच्या बहाण्यानं एका मुलीने दुकानदाराला बोलण्यात गुंगवलं आणि दुसर्‍या मुलीनं दागिन्यांवर हात साफ केला. या मुलीचा पोलीस शोध घेत आहे. या चोरीच्या घटनामागे एखादी मुलींची टोळी असावी असा संशय व्यक्त करण्यात येतो.

close