ओबामांसाठी भारतात मोर्चेबांधणी

November 2, 2008 5:19 PM0 commentsViews: 7

2 नोव्हेंबर,कर्नाटक दिल्लीतल्या अमेरिकन तरुणांप्रमाणेच बंगलोरमधील तरुणही आता ओबामा यांच्या प्रचार मोहिमेसाठी समोर आलेले आहेत. ओबामा यांच्या प्रचार अभियानासाठी या लोकांनी 2 लाख रुपयेही गोळा केले आहेत. जगभरातल्या आर्थिक मंदीचं सावट मिटवण्यात ओबामांना यश येईल,असा विश्वास बंगलोरच्या तरुणांना वाटत आहे.गेल्या चार महिन्यांपासून हे तरुण ओबामा यांच्यासाठी समर्थन मिळवत आहे. यु ट्युबवर ओबामाचं भाषण हे तरुण ऐकत असतात. ओबामा यांच्या विजयाला हातभार लाभावा, यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांचा निधीही एकत्रित केला आहे.अमेरिकेत असलेल्या भारतीयांनी ओबामांनाचं व्होट द्यावं, यासाठी या तरुणांचा प्रयत्न आहे. ओबांमासाठी जितकं आकर्षण या तरुणांना आहे, तितकं भारतीय नेत्यांविषयी दिसून आलं आहे. फक्त राहुल गांधी ओके ,असं मत तरुणांनी नोंदवलं.अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी या सर्वांना ओबामांच नावही फारसं परिचित नव्हतं. पण ओबामाचं,अमेरिकेचं वर्तमान आणि भविष्य बदलतील, असा विश्वास या तरुणांना आहे. अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीचा फटका अप्रत्यक्षपणे या तरुणांनाही बसतोय. अमेरिकेत आलेली आर्थिक मंदी मिटवण्यात ओबामांना यश येईल. हीच एक छोटीसी आशा या तरुणांना आहे.

close