मनसे आमदार मारहाण प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा – खडसे

January 10, 2011 3:26 PM0 commentsViews: 2

10 जानेवारी

कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटत आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी मारहाण केली. या मारहाणीचा निषेध करत पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. तसेच या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी ही मागणी केली. खडसें औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.

close