भारताची ‘तेजस’ भरारी

January 10, 2011 5:23 PM0 commentsViews: 21

10 जानेवारी

तेजस हे भारतीय बनावटीचं लढाऊ विमान एअरफोर्समध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यासाठीची प्रक्रियाही सुरु झाली. तेजसनं आज बंगळुरूमध्ये भरारी घेतली. आणि लढाऊ विमान बनवणार्‍या मोजक्या देशांच्या यादीत भारताचंही नाव दाखल झालं. संपूर्ण भारतीय बनावटीचं हे पहिलचं सुपरसॉनिक फायटर एअरक्राफ्ट आहे. 17 हजार कोटींचा प्रकल्प आहे.

तेजस फायटर प्लेननं भरारी घेतली. आणि त्याकडे डोळे लावून असणार्‍या सगळ्यांनीच अभिमानानं मान उंचावली. गेल्या अनेक वर्षांपासून ते या क्षणाची वाट बघत होते. तेजस या मल्टीरोल लाईट कोम्बॅट एअरक्राफ्टनं जवळपास एका दशकानंतर पहिली भरारी घेतली. भारतीय बनावटीच्या या फायटर प्लेनला ऑपरेशन क्लिअरन्स मिळाल आहे. त्यामुळे तेजसी एअरफोर्समध्ये दाखल होण्याची तयारी सुरु झाली. तेजसच्या उड्डाडामुळे भारत फायटर प्लेन तयार करणार्‍या देशांच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटननंतर आता या क्लबमध्ये भारताचंही नावं सामिल झालं. एअरफोर्सने आत्ताचं 40 तेजस प्लेनची मागणी केलीे.जी पुढीच्या दोन वषांर्त मिळतील.आणि तेजस मग जुनाटं मिग विमानांची जागा घेईलं.

तेजस विमानाचं सध्याचं इंजिन मात्र परदेशी आहे. अमेरिकन जनरल इलेक्ट्रीक कंपनीनं हे इंजिन बनवलं आहे. पण उरलेल विमान मात्र स्वदेशी आहे. चौथ्या जनरेशनच्या या लढाऊ विमानांमध्ये विविध शस्त्र तसेच चार टन वजनाचे रणगाडे वाहून नेण्याची क्षमता आहे.अत्याधुनिक अवकाशतंत्र आणि डिजिटल फ्लाईट्स सिस्टीमही यात आहे.पण अजूनही तेजस 100 टक्के तयार नसल्याचं अनेकाचं मतं आहे.तर तेजस मैदानात उतरण्याआधी त्यावर काही चाचण्या होणं बाकी आहे असं एअरफोर्सचं म्हणणं आहे.

कार्यक्रमात अनेक सुधारणा सुरु आहेत. अजून अनेक चाचण्या व्हायच्या आहेत. उच्च आणि कमी दाबाच्या चाचण्या वीज पडण्यासंर्भातली चाचणी, एलसीए आणि एडीए यांच्या या चाचण्यांमुळे आमच्या सेवेत तेजस येईल तेव्हा 100 टक्के तयार असेल. तेजसला पहिलं उड्डाण घेण्यासाठी 27 वर्षं लागली. त्यामुळे तेजसच्या आर्थिक गणितांवर मोठा परिणाम झाला.पण तेजसला मिळालेल्या ऑपरेशनल क्लिअरन्सनंतर मध्यम लढाऊ विमान सुरु करण्याचा विचारही आता सुरु झाला.तेजसच्या जडणघडणीत हातभार असलेल्या टीमला आता आशा आहे.ती हे विमान यशाचा आणखी एक टप्पा गाठेल यांच.ं

close