2 जी स्पेक्ट्रमचा रिपोर्ट कॅगच्या ऑफिसनं फोडला -सिब्बल

January 10, 2011 6:03 PM0 commentsViews: 1

10 जानेवारी

दूरसंचार मंत्री कपील सिब्बल आणि कॅग यांच्यात आता संघर्ष निर्माण झाला. 2 जी स्पेक्ट्रम बद्दलचा अहवाल कॅगनं फोडल्याचा आरोप सिब्बल यांनी सीएनएन-आयबीएनच्या एका कार्यक्रमात बोलताना केला.2 जी स्पेक्ट्रमबाबत कॅगच्या अहवालात त्रुटी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. दरम्यान कॅग म्हणजेच महालेखापरीक्षक विनोद राय यांनी सिब्बल यांच्या आरोपांना उत्तर दिलं. अहवालातला प्रत्येक शब्द बरोबर असल्याचं त्यांनी म्हटलंय. दूरसंचार मंत्र्यांचे वक्तव्य संसदेचं नियम मोडणारे आहेत. या प्रकरणाची लोकलेखा समिती चौकशी करत असताना कोणत्याही अधिकार्‍यानं किंवा मंत्र्यानं खुलेआम चर्चा करणं अयोग्य आहे असं राय यांनी म्हटलं आहे.

close