तिवारींची हकालपट्टी निश्चित

January 11, 2011 8:03 AM0 commentsViews: 2

11 जानेवारी

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणीराज्य सरकारनं आदेश देऊनही आडमुठेपणा करणारे मुंबई विभागाचेमाहिती आयुक्त रामानंद तिवारी यांची अखेर हकालपट्टी होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.आता हा प्रस्ताव राज्य सरकार राज्यपालांकडे पाठवणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेतला. तसेच तिवारी यांची नियुक्ती ही राजकीय आहे त्यांची हकालपट्टी ही आरटीआय कायद्याखाली होणार आहे असं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले

दरम्यान रामानंद तिवारी यांना राज्य सरकारनं आदेश देऊनही त्यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ करत होते. उलट तिवारी यांनी दीर्घ रजेवर जाण्याचा अर्ज दाखल केला होता. पण त्यांचा रजेचा अर्ज राज्यपालांनी फेटाळला होता. राज्य सरकारनं सुभाष लाला आणि रामानंद तिवारी या दोघांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. सुभाष लालांनी आधी राजीनामा द्यायला नकार दिला होता.मात्र त्यानंतर काल त्यांनी राजीनामा दिला.

close