महागाई संदर्भात पंतप्रधानांची बैठक

January 11, 2011 8:52 AM0 commentsViews: 8

11 जानेवारी

देशातल्या वाढत्या महागाई संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बैठक घेतली मात्र ही बैठक कोणत्याही तोडग्या-विना संपली. ही बैठक उद्याही सुरु राहणार आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी 7 रेसकोर्स इथं ही बैठक 2 तास चालली. देशातल्या अन्नधान्याच्या वाढत्या किंमतींवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला पंतप्रधानांबरोबरच केंद्रीय अर्थ मंत्री प्रणव मुखर्जी, कृषिमंत्री शरद पवार तसंच नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया हेही उपस्थित होते. गेल्या महिन्यात देशातला महागाईचा दर 18 टक्क्यांवर पोहोचला होता. देशातल्या भाज्या विशेषत:कांदा तसेच दुधाच्या किंमतीही वाढत आहे. या किंमती कमी कशा करता येतील, वाढत्या महागाईला आळा कसा घालता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली. पण त्यात आज काहीही तोडगा निघू शकला नाही.

close