लादेनला पकडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – ओबामा

November 2, 2008 5:23 PM0 commentsViews: 2

2 नोव्हेंबर, वॉशिंग्टनपरवेज मुशर्रफ पायऊतार झाल्यापासून अमेरिकेत अल-कायदा चा प्रभाव वाढत चाललाय,याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अल-कायदा चा नायनाट आणि लादेनला पकडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं ओबामांनी ठणकावून सांगितलंय.भारतापासून नव्हे तर स्वतःचं पोसलेल्या अतिरेक्यांपासून पाकिस्तानला सर्वात मोठा धोका असल्याचं अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांनी म्हटलंय. पाकिस्तानातल्या अस्थैर्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत हाच आपला शत्रू असल्याचा पाकिस्तानचा समज चुकीचा असल्याचं ओबामा यांनी सांगितलंय. पाकिस्तानात लोकशाही येऊन स्थैर्य निर्माण व्हावे, यासाठी अमेरिकेनं आजवर पाकिस्तानला सर्वोतोपरी मदत दिल्याचं ओबामा म्हणाले.सत्तेत आल्यास पाकिस्तानला लष्करी मदतीशिवाय अन्य मदत देणार असल्याचं ओबामांनी म्हटलंय.

close