जैतापूरमध्ये शाळांवर बहिष्कार दुसर्‍या दिवशीही सुरुच

January 11, 2011 9:56 AM0 commentsViews: 1

11 जानेवारी

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या निषेधार्थ जैतापूर आणि आसपासच्या 20 गावातील पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळांवर दोन दिवसांचा बहिष्कार घातला. बहिष्काराचा आजचा दुसरा दिवस आहे. एकूण 91 शाळांचा बहिष्कार आहे. रत्नागिरीच्या प्रांताधिकार्‍यांनी शिक्षकांना बोलावून विद्यार्थ्यांना प्रकल्पाची माहिती द्या आणि त्यांच्याकडून प्रकल्पाचा प्रचार करुन घ्या असे आदेश दिल्यानं जैतापूर परिसरात संतापाची लाट उसळली. माडबन, जानशी, मिठगवाणे, करेल, निवेली , कुवेशी, दळे, तुळसुंदे आणि जैतापूर परिसरातल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बहिष्काराचं हे सत्र आणखी आठवडाभर चालणार असल्याचं समजतंय.

close