वाहतूक पोलिसांच्या सुरक्षा सप्ताहा अंतर्गत जनजागृती मोहीम

January 11, 2011 10:07 AM0 commentsViews: 5

11 जानेवारी

वाहतूक पोलिसांच्या रस्ता सुरक्षा सप्ताहा अंतर्गत ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट आणि स्मोक फ्री मुंबई या एनजीओनं टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी जागृती मोहीम सुरु केली. मुंबईच्या डोमेस्टीक एअरपोर्टवर आज ही मोहीम राबवण्यात आली. टॅक्सी आणि रिक्षा चालवताना धुम्रपान करु नये गुटखा खाऊ नये तसेच गाडीत बसलेल्या प्रवाशालाही तसं करुन देऊ नये असं सांगण्यात आलं. तंबाखु सेवनामुळे होणारे वेगवेगळे आजार आणि त्याच्या परिणामांची जाणीव करुन देण्यात आली. तीन दिवसांच्या या मोहीमेला टॅक्सी चालकांही चांगला प्रतिसाद दिला. टाटा हॉस्पीटलने या वाहनचालकांना हेल्थ चेकअप कुपन्स दिलेत त्याअंतर्गत त्यांना टाटा हॉस्पीटलमध्ये जाऊन सवलतीत चेकअप करुन मिळणार आहे.

close