जाधव यांना जामीन; पोलिसांच्या बदल्या

January 11, 2011 12:12 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी

कन्नडचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज जामीन मंजूर करण्यात आला.5 जानेवारीला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गाडी घातली आणि पोलिसांना मारहाण केली आसा आरोप ठेवत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना मारहाणही करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारीला आमदार जाधव यांना कोर्टात हजर करण्यता आलं. कोर्टानं त्यांना 4 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज पुन्हा कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला.

आमदार हर्षवर्धन जाधव मारहाणप्रकरणाच्या ऍक्शन टेकन रिपोर्ट तयार झाला आणि या अहवालात दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणातील पोलीस अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस ऍक्शन टेकन रिपोर्टमध्ये करण्यात आली. मात्र उद्या राज यांची औरंगाबाद इथं सभा होत असल्यानं त्या सभेपूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, पोलीस उपअधीक्षक शिवराज पाटील आणि पोलीस उपअधीक्षक अभिमन्यू पवार यांच्या तडकाफडकी बदल्या गृहमंत्रालयानं केल्या आहेत. मात्र ऍक्शन टेकन रिपोर्टनुसार जी कारवाई अपेक्षित आहेत ती न्यायालयाच्या निर्णयानंतर होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असलेले हर्षवर्धन जाधव यांना सरकारी हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जाधव यांच्या प्रकृतीविषयीचा मेडिकल रिपोर्ट अजूनही कोर्टात सादर झाला नसल्यानं कोर्टानं सरकारी डॉक्टरांना नोटीस पाठवली आहे.

दुसरीकडे उद्या म्हणजे बुधवारी औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे या सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या सभेच्या अगोदरचं पोलीस अधिकार्‍यांची बदली झाली आहे.

close