औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला ‘अटी’सह परवानगी

January 11, 2011 12:57 PM0 commentsViews: 1

11 जानेवारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली. सभेदरम्यान काही प्रक्षोभक बोलू नये, कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. ही सभा उद्या संध्याकाळी 6-10 दरम्यान औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. सभेच्या ठिकाणी तसेच शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस दल, शिघ्रकृती दल, होमगार्ड्स आणि इतर जिल्ह्यातूनही पोलीस बंदोबस्तासाठी येणार आहे. सभेच्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शहरातही महत्त्वाच्या भागातही कॅमेरे लावले आहेत. एकूण साधारण 200 कॅमेरे वापरणार आहेत

close