देशातील 44 अभिमत विद्यापीठाना दिलासा

January 11, 2011 1:25 PM0 commentsViews: 1

11 जानेवारी

44 अभिमीत विद्यापीठांमध्ये म्हणजेचं अभिमत विद्यापीठांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिला. या विद्यापीठांना अभिमत दर्जा पुन्हा बहाल करण्याबाबत विचार करु असं आश्वासन केंद्रानं सुप्रीम कोर्टात दिलं आहे. 2010 मध्ये टंडन समितीने देशभरातल्या 132 पैकी 44 अभिमत विद्यापीठ रद्द करावीत अशी शिफारस केली होती. यानंतर या विद्यापीठांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता केंद्र सरकारनेचं आपली भूमिका मवाळ केली असून या 44 विद्यापीठांना नोटिसा पाठवून सर्व कमतरतांची कारणं मागितली आहे. या विद्यापीठांकडून उत्तर आल्यानंतर केंद्र सरकार आपला अहवाल बनवणार असून तो अहवाल 3 मे रोजी सुप्रीम कोर्टात सादर करणार आहे.

close