पिवळ्या पाण्याचा पुरवठा चार दिवसानंतरच थांबेल !

January 11, 2011 2:33 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी

मुंबईत सुरु असलेला पिवळ्या पाण्याचा पुरवठा चार दिवासनंतरच थांबू शकेल अशी माहिती सह आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी दिली. त्यांनी ही माहिती बीएमसीनं बोलावलेल्या विशेष सभेत दिली. 20 पेक्षा जास्त नगरसेवक पिवळ्या पाण्याच्या बाटल्या घेवून सभागृहात आले होते. यावेळी अप्पर वैतरणा धरणातनं होत असलेल्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे पिवळ्या रंगाचं पाणी येत असावं अशी शक्यता जल अभियंत्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सध्या अप्पर वैतरणाचा पाणी पुरवठा थांबवण्यात आला. त्यामुळे चार दिवसा नंतरच मुंबईला स्वच्छ पाणी पुरवठा होऊ शकेल अशी अपेक्षा जल अभियंत्यांनी व्यक्त केली.

दरम्यान पिवळ्या पाण्याच्या पुरवठ्याची आता राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली. या पाण्याबाबत चौकशी करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे वैतरणा, मोडकसागर आणि इतर धरणांची पाहणी करणार आहेत. तसेच या पाहणीचा अहवाल ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

close