केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता

January 11, 2011 3:55 PM0 commentsViews: 1

11 जानेवारी

महागाई, घोटाळे यांच्यामुळे अडचणीत आलेले पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ अधिक सर्वसमावेशक करण्याचा पंतप्रधानांचा विचार आहे. 14 जानेवारीनंतर पण हा महिना संपण्यापूर्वीच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. परफॉर्मन्स आणि स्वच्छ प्रतिमा या निकषांवर हे फेरबदल होणार आहेत. वाढत्या महागाईमुळे कृषिमंत्री शरद पवार अडचणीत आलेत. त्यामुळे त्यांच्याकडच्या कृषी आणि अन्न या दोन खात्यांचं विभाजन होऊ शकतं. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार काढून घ्यावा अशी विनंती काही महिन्यांपूर्वी पवारांनीच पंतप्रधानांकडे केली होती.

मंत्रिमंडळात फेरबदल..

- शरद पवारांकडच्या कृषी आणि अन्न या दोन खात्यांचं विभाजन होण्याची शक्यता – खराब कामगिरीमुळे ग्रामविकास मंत्री सी. पी. जोशी यांचं पद जाण्याची शक्यता- खाणकाम मंत्री बी. के. हंडीक यांचंही पद जाण्याची शक्यता – कॉर्पोरेट अफेअर्स राज्यमंत्री सलमान खुर्शीदना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं- वाणिज्य राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे परराष्ट्र राज्यमंत्री बनू शकतात – दूरसंचार मंत्रालय काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता – गुलाम नबी आझाद आंध्र प्रदेशचे प्रभारी बनू शकतात- आझाद यांचं आरोग्य मंत्रीपद जाण्याची शक्यता

close