शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह सायकलवरून नेला

January 11, 2011 5:17 PM0 commentsViews: 6

11 जानेवारी

मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली. शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह सायकलवरून 14 किलोमीटर दूर घेऊन जाण्याची दुदैर्वी वेळ एका व्यक्तीवर आली. दुधमनिया या गावात एका आदिवासी मुलीनं विष घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी पंचनामा केला. आणि शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह अन्नुपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन या, अशी सूचना मुलीचे वडील गोकुळ गोंड याला केली. वाहनाची दुसरी सोय नसल्यानं गोंड यानं अन्नुपूरपर्यंत आपल्या मुलीचा मृतदेह सायकलवरून नेला.

close