आता अंडी ही महागली !

January 11, 2011 5:35 PM0 commentsViews: 32

11 जानेवारी

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे…हे जुनं जिंगल आपण अनेकवेळा ऐकलंय पण अंडी दररोज खाणं हे या हिवाळ्यात आता महागडं ठरणार आहे. कांदा आणि भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरानं सर्वसामान्यांना रडवलं. आता अनेकांच्या दररोजच्या नाश्त्यातील मुख्य घटक असणारी अंडीही महागली आहेत. देशभरात अंड्यांचे दर आकाशाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं बजेट कोलमडलं आहे. फक्त कांदा आणि टोमॅटोलाच नव्हे. तर महागाईनं आता ब्रेकफास्टलाही हादरा दिला. अंड्यांचे दर देशभरात आकाशाला भिडले आहे. विशेषतः उत्तर भारतात अंडी खूपच महाग झाली आहेत.हिवाळ्यात अंड्यांचे दर नेहमीच वाढतात. पण यंदा त्यात झालेली वाढ सर्वसमान्यांचं बजेट कोलमडून टाकणारी आहे.

महागाईची कारणं

- थंडी आणि दाट धुक्यांमुळे अंड्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय- महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून अंड्यांचा मोठा पुरवठा होतो, तो कमी झालाय- हिवाळ्यात अंडी खाण्याचं प्रमाण वाढतं, पण उत्पादन मात्र वाढत नाही – 2008-2009 मध्ये भारतात 55 अब्ज 64 कोटी अंड्यांचं उत्पादन झालं होतं- तर 2009-2010 मध्ये 59 अब्ज 80 कोटी अंड्यांचं उत्पादन झालं होतं

कोलकाता आणि दिल्लीत अंड्यांच्या दरात डझनमागे सहा रुपयांची वाढ झाली. तर पाटण्यात तब्बल 12 रुपयांची वाढ झाली. थंडी कमी होईल तसं जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत दर स्थिर होतील असं उत्पादकांमधल्या सूत्रांनी सांगितलं. पण वाढत्या महागाईमुळे सध्यातरी सर्वसामान्य माणूस हतबल झाला.

महागाईनं कोलमडलं बजेट

जाने. 2011 जाने. 2010

कांदा 65 रु. किलो 30 रु. किलो

दूध 34 रु. लीटर 28 रु. लीटर

अंडी 48 रु. डझन 36 रु. डझन

close