पुण्यात लोहगाव घोटाळ्यामध्ये सभासदांचं सदस्यत्व न सांगता रद्द

January 11, 2011 5:36 PM0 commentsViews: 1

11 जानेवारी

पुण्यातील लोहगाव सैनिक कॉलनी घोटाळ्यामध्ये आता आणखी एक धक्कादायक बाब उघडकीला आली. या सोसायटीचे मूळ सभासद असलेल्या 100 जणांनी त्यांचं सदस्यत्व रद्द होण्यासाठी अर्ज न देताच त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. आणि त्यांच्या जागी 100 आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांना सदस्यत्व दिल्याचं आता उघड झालं. या मूळ 100 सभासदांनी आज उपजिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली आणि आपलं सोसायटीचं सभासदस्यत्व रद्द होऊ नये या प्रकरणातल्या खर्‍या दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली.

close