तिवारी यांच्या पत्नीचा पत्रकारांवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न

January 11, 2011 6:34 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी राज्य सरकारनं आदेश देऊनही आडमुठेपणा करणारे मुंबई विभागाचे माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांची अखेर हकालपट्टी होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव राज्य सरकार राज्यपालांकडे पाठवणार आहे. दुसरीकडे रामानंद तिवारी यांच्या पत्नीनं आज प्रतिक्रिया घ्यायला गेलेल्या पत्रकारांशीच असभ्य वर्तन केलं. तिवारी यांच्या पत्नी शीला तिवारी ज्या स्वत: माजी सनदी अधिकारी होत्या त्यांनी पत्रकारांशी अत्यंत असभ्य वर्तन केलं. पत्रकारांशी त्या वाट्टेल ते बोलत होत्या. तसेच प्रतिक्रिया विचारणार्‍या पत्रकारांच्या अंगावरही त्या धावून गेल्या पत्रकारांच्या दिशेने शीला तिवारी यांनी चप्पल फेकण्याचाही प्रयत्न ही केला. एकेकाळी मुंबई शिक्षण विभागाच्या उपसंचालक म्हणून त्या काम पाहत होत्या. पण शिक्षक भरती प्रक्रियेत घोटाळा केल्याच्या आरोपावरुन त्यांची महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमध्ये राज्याच्या उपसंचालक म्हणून बदली करण्यात आली होती. पण एवढ्या जबाबदार पदावर काम पाहिलेल्या शीला तिवारी यांचं हे वर्तन मात्र धक्का बसावा असंच आहे. एवढं होऊनही रामानंद तिवारी आपल्या पत्नी शीला तिवारी यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते.

close