कलमाडींची पुन्हा चौकशी

January 12, 2011 6:00 AM0 commentsViews: 1

12 जानेवारीकॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी यांची सीबीआय पुन्हा चौकशी करणार आहे. पुढच्या आठवड्यात ही चौकशी होण्याची शक्यता आहे. क्वीन्स बॅटन रिलेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कलमाडी यांना प्रश्न विचारण्यात येतीलअशी शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. सीबीआयला टी.एस.दरबारी आणि कलमाडी यांच्या उत्तरांमध्ये तफावत आढळली आहे.त्यामुळे सीबीआय ही पुन्हा चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी कलमाडी यांची सीबीआयने नऊ तास चौकशी केली होती.

close