महागाईच्या मुद्यावर पंतप्रधानांची आज पुन्हा बैठक

January 12, 2011 6:13 AM0 commentsViews: 2

12 जानेवारी

महागाईच्या मुद्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वत:लक्ष घातलंय.महागाई रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याच्यावर पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज पुन्हा बैठक होत आहे. काल दोन तास झालेल्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज पुन्हा पंतप्रधानांनी बैठक बोलावली आहे. देशभरात भाजीपाला विशेषत:कांद्याचे भाव वाढतच आहेत. त्यातच अंडी आणि मटणाचे भावही वाढल्यानं सर्वसामान्यांना रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. या बैठकीला अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, कृषिमंत्री शरद पवार तसेच नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया उपस्थित आहेत.

close