‘मौका सभी को मिलता है’ – राज ठाकरे

January 12, 2011 2:42 PM0 commentsViews: 13

12 जानेवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये जंगी सभा घेतली. राज यांच्या या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करत राज यांनी चौफेर हल्लाबोल केला. मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना गृहमंत्री आर.आर.पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी मारहाण केल्याच आरोप राज ठाकरेंनी केला. जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी आज औरंगाबादमध्ये निषेध सभा घेतली. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती.हर्षवर्धन जाधव यांचे वडील काँग्रेसमध्ये होते. पण जाधव हे मनसेत दाखल झाले त्यामुळे आर.आर.पाटील यांनी जाधव यांच्यावर राग काढण्यासाठी ही मारहाण घडवून आणल्याचा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला. तसेच ज्या पोलीस अधिकार्‍यांनी जाधव यांना मारहाण केली त्यांना निलंबित करा अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, आमदार हर्षवर्धन जाधव मारहाणप्रकरणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा रिपोर्ट आला. त्यात हर्षवर्धन जाधव यांना खूप मारहाण झाल्यानं गंभीर जखमा झाल्याची माहिती देण्यात आली. याचा अर्थ ज्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये जाधव यांना सर्वप्रथम ऍडमीट करण्यात आलं होतं त्यांचा रिपोर्ट आणि आताचा रिपोर्ट यात तफावत असल्याचं बोललं जातंय.

close