महागलेल्या भाजीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली

January 12, 2011 7:20 PM0 commentsViews: 6

12 जानेवारी

अवकाळी पावसामुळे राज्यात भाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे आता गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातून भाज्यांची आवक वाढलीय. आज मार्केटमध्ये 550 गाड्यांची आवक झाली. ग्राहकांनी महागाईमुळे भाजीपाल्याकडे पाठ फिरवल्याने किरकोळ बाजारपेठेतही भाज्यांना उठाव नाही. याचा परिणाम एपीएमसी मार्केटमध्येही दिसून आला. घाऊक बाजारपेठेमध्ये भाज्यांचे दर 50 टक्क्यांनी कमी होऊनही किरकोळ व्यापार्‍यांनी मात्र अजूनही चढे भावच ठेवले. किरकोळ व्यापार्‍यांच्या मुजोरीपणामुळे ग्राहकांच्या खिशाला तर फटका बसतोच आहे. पण याचा शेतकर्‍यांवरही त्याचा परिणाम होतो.

close